नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला सन्माननीय पाहुणे म्हणून किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सोरोनबे सारीपोविच जिनबेकोव्ह उपस्थित होते.
शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष पद सध्या किर्गिस्तानकडे असून, दक्षिण आशियातला किर्गिस्तान हा भारताचा महत्वाचा भागिदार आहे. किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सोरोनबे सारीपोविच जिनबेकोव्ह यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या तसेच 13 ते 15 जून 2019 दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले.
भारत आणि किर्गिस्तान यांच्यात स्नेहपूर्ण संबंध असून, गेल्या काही वर्षात द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल मोदी यांनी जिनबेकोव्ह यांचे आभार मानत आपण लवकरच किर्गिस्तानला भेट देऊ असे आश्वासन दिले.