मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात प्रगतीपथावर असलेल्या सर्व विकास प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे.
या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या शेतकरी आणि आदिवासींनी प्रकल्पाला विरोध केला आहे. ठाकरे यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं, की सामान्य माणसांसाठी हे सरकार काम करत असून, त्यादृष्टीनं फेरआढाव्याचा आदेश दिला आहे.
आरेमधल्या कारशेडच्या कामाला दिली तशी स्थगिती आपण बुलेट ट्रेन प्रकल्पाला दिलेली नाही. या मुद्दयांचं राजकारण करणार नाही, असं ते म्हणाले. राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दलची श्वेतपत्रिका सरकार लवकरच प्रसिद्ध करेल, असं त्यांनी सांगितलं.