नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबादमधे पशुवैद्य डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. मात्र या चकमकीत एका पोलिस उपनिरिक्षकासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं हैद्राबादचे पोलीस आयुक्त सज्जनार यांनी सांगितलं.
आरोपींनी पोलिसांवर प्रथम दगडफेक करुन काठ्यांनी हल्ला करण्याचा तसंच त्यांची हत्यारं हिसकावून घेण्याचाही प्रयत्त्न केला, असं त्यांनी चाटनपल्ली इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आरोपींना वारंवार इशारा देऊनही त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही म्हणून पोलिसांना गोळीबार करावा लागला, असंही आयुक्तांनी सांगितलं.