नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक नियम शिथिल करत आणि अधिक उदारवादी दृष्टिकोन स्वीकारत सौदी अरेबियाने महिला आणि कुटुंबियांसाठी तसेच एकट्या पुरुषांसाठी  हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मध्ये स्वतंत्र प्रवेश आणि बसण्याची व्यवस्था आवश्यक असलेला नियम रद्द केला आहे.

अनेक मोठ्या हॉटेल आणि रेस्टोरंटनी यापूर्वीच या नियमाची अंमलबजावणी सुरु केली असून सरकारच्या या औपचारिक घोषणेमुळे आता सर्वच हॉटेलांमध्ये सुधारित नियम लागू होईल.