पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन 2019-20 या वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्हयातील 113 भौतिक व आर्थिक 130 लाख तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी भैातिक 23 व आर्थिक 131.50 लाख उद्दीष्टे प्राप्त झाले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रुपये 10 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज परतावा तसेच रुपये 10 ते 50 लाखापर्यंत समकक्ष गटकर्ज व्याज परतावा योजना आहे. सदर दोन्ही योजना बँकेमार्फत राबविली जाईल. कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रामाणिकरणानुसार (जास्तीत जास्त 12 % पर्यंत) महामंडळाकडून केला जाईल.

वैयक्तिक गट परतावा योजनेसाठी लाभार्थींची (इतर मागासवर्गीय) कौटूंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रूपये आहे, तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वय 18 ते 50 पर्यंत, कर्ज खाते,आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य असणार आहे. महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य असून उमेदवाराने अर्ज करतेवेळी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, बँकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, कुटुंबातील एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

लाथार्थीने मध्येच कर्ज परतफेड केली नाही तर व्याज परतावा दिला जाणार नाही. गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी शासनमान्य बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी कायदा 2013) च्या वेबपोर्टलनुसार अर्ज करु शकतात. गटातील उमेदवाराने अर्ज करतेवेळी या प्रकरणासाठी व यापूर्वी महामंडळाच्या व इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा, गटाने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत कलेले असावे.

गटाच्या भागीदाराचे किमान 500 कोटीच्या ठेवी असलेल्या व कोअर बँकिंग सिस्टीम असलेल्या राष्ट्रीयकृत / शेडयुल्ड बँकेत खाते असावे. गटातील सर्व सदस्यांच्या क्रेडीट स्कोर किमान 500 असावा.