नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युझीलंडमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रकात मरण पावलेल्या आणखी ४ जणांची नावं जाहीर झाली आहेत. हे ४ जण ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत.

या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत. २० जणांना भाजल्यामुळे अति दक्षता विभागात दाखल केलं आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकात ८ ऑस्ट्रेलियन, २ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.