नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूंच्या विशेष प्रतिनिधींची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. सीमाप्रश्नावर दोन्ही देशांमध्ये होणारी ही बाविसावी बैठक असेल.

भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल करतील, तर चीनच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व चीनचे परराष्ट्र मंत्री वॅन्ग यी करतील.

चेन्नईत गेल्या ऑक्टोबरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जीनपिंग यांच्यात झालेल्या दुसऱ्या अनौपचारिक परिषदेनंतर दोन्ही देशांमध्ये होत असलेली विशेष प्रतिनिधींची ही पहिलीच बैठक आहे.