नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे ज्येष्ठ नेते, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधी पक्षशासित राज्यांनी जनतेला आरोग्य सुविधा पुरविणारी आयुष्मान भारत केंद्रीय योजना लागू केली नसल्याचा आरोप केला आहे. ते नवी दिल्लीत रामलीला मैदानावर झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात बोलत होते.

दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांचं नाव न घेता जावडेकर म्हणाले, भाजप सरकारनं मेट्रो रेल्वेच्या विस्तारासह अनेक विकासात्मक प्रकल्प हाती घेतले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीत सरकार खोटी आश्वासनं देत असल्याचा आरोप पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.

राज्यातील सरकार जाहिराती देण्यात मश्गुल असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस आणि आपचे नेते दिल्लीतलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. केंद्र आणि  दिल्लीत भाजपाच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजधानीचा विकास शक्य आहे, असंही डॉ. हर्षवर्धन म्हणाले.