नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त 25 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी असली तरी हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
माहितीचा अधिकार प्रशिक्षण, प्रशासनातल्या उत्कृष्ट संकल्पनांचं सादरीकरण, सेवाविषयक प्रशिक्षण, तणाव मुक्ती व्यवस्थापन, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी, यासारखे उपक्रम जिल्हा प्रमुख कार्यालयांनी सुशासन दिनी राबवण्याचे निर्देश नांदेडच्या जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.