नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त ४७ व्या राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन २७ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान नांदेड इथं करण्यात आलं आहे.
नांदेड मधल्या दुष्टदमन क्रीड़ा आणि युवक मंडळाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत देशातले 16 नामवंत राष्ट्रीय हॉकी संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक गुरमीत सिंग नवाब यांनी दिली.
१९७२ पासून ही स्पर्धा नांदेड इथं आयोजित केली जाते. गुरुद्वारा त्खत सचखंड बोर्ड नांदेड, गुरुद्वारा लंगर साहेब, गुरुद्वारा नानकझिरा साहिब बिदर, कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं.