मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ होतं. विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं सोळा पूर्णांक आठ अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं.