नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व मोठ्या सहकारी बॅकांनी 5 कोटी आणि त्यापेक्षा अधिक रक्कमेच्या कर्जांची माहिती सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ इन्फर्मेशन ऑन लार्ज क्रेडीट्स् कडे सादर करावी, असे निर्देश रिझर्व्ह बॅकेने दिले आहे.
आर्थिक संकंटांची पूर्व सूचना मिळणं यामुळे शक्य होईल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं देशातल्या व्यासायिक बँका, वित्तीय संस्था आणि काही बँकेतर वित्तीय संस्था यांच्यासाठी CRILC हा गट तयार केला आहे.
आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याबरोबरच आर्थिक संकटाच्या काळात उपाय योजना सुचवण्यासाठी हा गट कार्य करेल.