नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेजावर मठाचे स्वामी विश्वेषा तीर्थ यांचं आज सकाळी कर्नाटकात उडपी इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. तीर्थ यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सकाळी के एम सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते पेजावर मठाचे ३२ वे स्वामी होते.

विश्वेषा तीर्थ यांनी आपल्या कारकिर्दित अनेक समाजउपयोगी कामं केली. त्यांनी गरिबांसाठी वसतीगृह, रुग्णालयं आणि शाळा उभारल्या. स्वामी यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, माजी मंत्री उमा भारती यांनी स्वामी यांना उडपी इथं जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.