नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२६ पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. इंग्लंड स्थित CEBR अर्थात आर्थिक आणि व्यापारविषयक संशोधन संस्था यांच्या एका अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

‘वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबल ‘२०२०’ या नावाच्या या अहवालात २०२६ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलर्सवर पोहोचेल तर २०३४ पर्यंत जपानला मागे टाकत भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असं म्हटलं आहे.

२०१९ या वर्षात फ्रान्स आणि ब्रिटन यांना मागे टाकत भारत जगातली पाचव्या क्रमाकाची मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. या अहवालासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आर्थिक दृष्टीकोनाची माहिती आधारभूत मानली आहे.