मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, जिंतेद्र आव्हाड, आणि राजेश टोपे यांच्यासह १४, तर कांग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमित देशमुख, बाळासाहेब पाटील, के. सी. पाडवी यांच्यासह १० आमदारांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
शिवसेनेच्या कोट्यातून संजय राठोड, गुलाबराव पाटील, अनिल परब, उदय सामंत, आदित्य ठाकरे, दादा भुसे, संदीपान भुमरे, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, बच्चू कडू, राजेंद्र येड्रावकर आदी आमदारांनी पद आणि गोपिनियतेची शपथ घेतली.