नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केला. या कायद्याविरोधात सुरु असलेली निदर्शनं राजकीय हेतूनं प्रेरित आहेत असा आरोपही  त्यांनी केला.

एखाद्याला भारतीय नागरित्व गमवावं लागेल, असा कोणताही नियम किंवा कलम या कायद्यात असेल तर ते दाखवावं असं आवाहनही त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिलं. २०२१ ला होत असलेली तसंच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तकेशी कसलाही संबंध नाही असंही शाह यांनी यावेळी स्पष्ट केलं.