नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा अमेरिकेच्या एफएए अर्थात फेडरल हवाई वाहतूक प्रशासकांनी अमेरिकी विमान कंपन्या आणि त्यांच्या वैमानिकांना जारी केला आहे.

या भागातल्या कट्टरवादी आणि बंडखोरांच्या कारवायांमुळे हा धोका असल्याचं प्रशासकांचं म्हणणं आहे. मात्र, पाकिस्तानातल्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात एका व्यक्तीला हाताळता येणाऱ्या विमानविरोधी प्रणालीचा वापर झाल्याचं वृत्त नाही, असं एफएएनं सांगितलं आहे.

या भागात सक्रिय असलेल्या कट्टरवादी किंवा बंडखोर गटांकडे अशा प्रकारची विमानविरोधी प्रणाली असल्याचा संशय आहे.