नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या परकीय चलन साठ्यात २७ डिसेंबर २०१९ रोजी संपलेल्या आठवड्यात दोन अब्ज ५ कोटी २० लाख डॉलर्सची वाढ होऊन, तो ४५७ अब्ज अमेरिकन डॉलर्स या विक्रमी पातळीवर पोचला आहे.

या साठ्याचा प्रमुख घटक असलेल्या परकीय चलन मालमत्तेत दोन अब्ज दोन कोटी डॉलर्सची वाढ झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. त्यापूर्वीच्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात ४५६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली होती. सोन्याच्या साठ्यात २६० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली.