नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि अन्य पक्षांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतच्या मुद्यांवरुन देशातल्या जनतेची दिशाभूल केल्यामुळेच हिंसा भडकल्याचा आरोप केला आहे. ते दिल्ली बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

पाकिस्तानातल्या नानकाना साहिब गुरूद्वारावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं शेजारी देशात धार्मिक छळाला सामोरं जावं लागणा-या अल्पसंख्यकांना दिलासा देण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायदा महत्त्वाचा असल्याचं अधोरेखित झाल्याचं त्यांनी सांगितलं. या कायद्याचा अल्पसंख्याकांच्या नागरिकत्वाशी काहीही संबंध नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लोककल्याणासाठी असलेल्या पैशाचा दुरुपयोग जाहीरातींसाठी खर्च करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातल्या जनतेची एखाद्या वेळेस दिशाभूल केली जाऊ शकते, मात्र वारंवार नाही, असं ते म्हणाले. रालोआ सरकार दिल्लीतल्या अनधिकृत वसाहती नियमित करणार असल्याचं शहा यांनी सांगितलं.