नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलाच्या कार्यात्मक आणि खरेदीविषयक बाबींचा एका बैठकीत आढावा घेतला. सध्या सुरु असलेले पायाभूत प्रकल्प आणि अद्ययावतीकरणाबाबत भविष्यातला नियोजन आराखडा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना माहिती दिली.
कार्यात्मक सज्जतेबाबत चर्चा करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या स्वतंत्र बैठका आयोजित करण्याच्या सूचना राजनाथ सिंह यांनी दिल्या. संरक्षण सचिव संजय मित्रा यांच्यासह मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.