नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील नामवंत अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्रातल्या उद्योजकांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं नीती आयोगाच्या कार्यालयात आर्थिक विकासासंदर्भात चर्चा करत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह, नीतीन गडकरी, नरेंद्र तोमर आणि पियुष गोयल या बैठकीला उपस्थित आहेत.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार तसंच व्ही के सारस्वत, रमेश चंद आणि व्ही के पॉल हे सदस्य आणि प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय, मंत्रिमंडळ सचिव आणि आणि अर्थ मंत्रालयाचे सचिव देखील उपस्थित आहेत.

व्हेंचर कॅपिटल फंडींग, उत्पादन, प्रवास आणि पर्यटन, तयार कपडे, एफएमसीजी, बांधकाम, डेटा आणि आर्थिक विश्लेषक अशा खाजगी क्षेत्रांसह, कृषी आणि आरोग्य निगा यांसारख्या प्राथमिक क्षेत्रांशी संबधितांचाही बैठकीत सहभाग आहे.

तरुण उद्योजकही बैठकीत सहभागी झाले आहेत.देशाची अर्थव्यवस्था आणि विकास या मुद्यांवर प्रामुख्याने भर दिला जात आहे.