नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते सुरक्षेबाबत लोकांना शिक्षित करणं आवश्यक असल्याचं मत परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित परिसंवादात बोलत होते. गेल्या पाच वर्षात रस्ते अपघातांमधे झालेल्या 4 टक्के वाढीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

रस्ते अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्याचं आवाहन त्यांनी केलं. जागतिक तसंच आशियाई विकास बँकेनं रस्ते सुरक्षा वाढीसाठी तसंच अपघातप्रवणं क्षेत्रं कमी करण्यासाठी सात हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी रस्ते सुरक्षा क्षेत्रात काम करणा-यांना एकत्र येऊन अपघात कमी करण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं.

देशात प्रतिवर्षी साडेचार लाख अपघात होत असून त्यात दीड लाख लोकांना जीव गमवावा लागतो. तसंच रस्ते अपघातात देशाचा 2 टक्के स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाया जाते. असंही राजनाथसिंग यांनी सांगितलं. होत असून त्यात दीड लाख लोकांना जीव गमवावा लागतो. तसंच रस्ते अपघातात देशाचा 2 टक्के स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाया जाते. असंही राजनाथसिंग यांनी सांगितलं.