नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळातल्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश द्यायची मागणी करणा-या याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं तीन आठवडयांसाठी स्थगित केली आहे.

सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांच्या अध्यक्षतेखालचं नऊ न्यायाधीशांचं घटनापीठ साठ याचिकांची सुनावणी करत आहे. त्यात मंदिर प्रवेशा व्यतिरिक्त मुस्लिम महिलांना मशीद आणि दर्ग्यात प्रवेश मिळावा, यासाठी आलेल्या याचिकांचाही समावेश आहे.