नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध येत्या २१ तारखेला महाभियोग सुरु होण्याची शक्यता आहे. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तपास करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याप्रकरणी ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवायला अमेरिकी संसदेनं गेल्या महिन्यात मंजुरी दिली.

त्याबाबत अमेरिकी प्रतिनिधी गृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी चार आठवडे याबाबत निर्णय रोखून धरल्यानंतर त्या या आठवड्यात आणि कदाचित आजच सिनेटकडे हा अभियोग पाठवतील, असा अंदाज आहे. शंभर सदस्यांच्या सिनेटमधे रिपब्लीकन पार्टीचं बहुमत असल्यानं तिथं महाभियोग मंजूर होण्याची शक्यता नाही.