नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सेना हा भारतमातेचा अभिमान विषय आहे अस म्हणत प्रधानमंत्र्यांनी जवानांचा अतुलनीय त्याग आणि शौर्य याला सलाम केला आहे.

भारतीय लष्कराचे शेवटचे ब्रिटिश प्रमुख सर एफआरआर बचर यांच्याकडून जनरल के एम करीअप्पा यांनी १९४९ मधे याच दिवशी पदभार स्वीकारला, आणि स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख झाले. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.