मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने नोव्हेंबर, 2019 मध्ये घेतलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेडया शासकीय रेखाकला परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत आहे. या दोन्ही परीक्षांना मिळून 2019 साठी एलिमेंटरीसाठी 3,78,131 व इंटरमिजिएटसाठी 2,84,168 असे एकूण 6,71,299 परीक्षार्थ्यांची नावे नोंदविलेली होती. एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेचा निकाल अनुक्रमे 92.35 टक्के व 85.70 टक्के इतका लागला आहे.

एलिमेंटरी परीक्षेत कु.वागसकर कोमल सतीश ही विद्यार्थिनी पिंपरी चिंचवड म्युनीसिपल्स माध्यमिक विद्यालयकाळभोर नगरपुणे या केंद्रावरुन राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच इंटरमिजिएट परीक्षेत कु.चंदनशिवेगौरी केराप्पा ही विद्यार्थिनी एच.एच.सी.पी.हायस्कुलहुजूरपागापुणे याकेंद्रामधून राज्य स्तरावर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.