नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सुरु असलेला महाभियोग म्हणजे लोकशाहीवरचा घातक हल्ला आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी महाभियोगाच्या प्रक्रियेदरम्यान दिलेल्या प्रतिसादात म्हटलं आहे.
ट्रम्प यांच्या विरोधात सिनेटमध्ये सुरु झालेल्या महाभियोगाच्या खटल्याविरोधात त्यांच्या वकीलांनी पहिल्यांदाच, एका विस्तृत निवेदनाच्या स्वरुपात प्रतिसाद सादर केला.
या संपूर्ण प्रक्रियेत ट्रम्प यांच्या विरोधातला कोणताही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही, हा खटला म्हणजे दोन हजार वीस साली राष्ट्राध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणूकीत हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे असा आरोपही या निवेदनातून केला आहे.