मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक न्याय विभागाच्या योजना समाजातल्या तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, अशा सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आज, २० जानेवारी रोजी झालेल्या समाज कल्याण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सामाजिक न्याय विभाग हा समाजातल्या वंचित घटकाला न्याय देणारा विभाग आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.