नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या प्रक्रियेत जो उशिर झाला तो हेतुपुरस्सर नव्हता, असं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हेतू पुरस्सर हा उशीर केला,अशा बातम्या प्रसार माध्यमांवर फिरत आहेत.
या बातम्यांचं खंडन करत निवडणूक अधिकारी कार्यालयानं हे स्पष्टीकरण दिल आहे. ही प्रक्रिया राबवताण ३० ते ३५ मिनटं लागतात तेवढाच वेळ केजरीवाल यांचा अर्ज भरताना लागला आहे, असंही कार्यालयानं सांगितलं.