मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तसेच विधानसभेचे अध्यक्ष, नाना पटोले आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनात ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी विधानपरिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उप सचिव विलास आठवले, मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, ऋतुराज कुडतरकर, सु. दा. सारंगकर, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव, शांतीलाल भोई, अवर सचिव रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे, सोमनाथ सानप, सायली कांबळी, जयवंत राणे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.