केंद्रीय मंत्रीमंडळ निर्णयांमुळे शेतकऱ्यांना शेती आधारित उद्योगांकरता मिळणार मदतीचा हात : प्रधानमंत्री
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाने आज घेतलेल्या निर्णयांमुळे कष्टाळू शेतकऱ्यांना शेती आधारित उद्योगांकरता मदतीचा हात मिळेल, अशी प्रतिक्रीया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
शिशु कर्जांवरच्या व्याजात सवलतीचा फायदा सूक्ष्म,लघु...
आतापर्यंत देशातले सुमारे अडीच लाख रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली : देशभरात काल, १० हजार ९९४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. यामुळे देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५६ पूर्णांक ३८ टक्क्यावर पोचलं आहे.
देशभरात...
ओडिशातल्या पुरीमध्ये जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी नंतर ओडिशातल्या पुरीमध्ये आज जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र त्यात यंदा भाविक सहभागी झालेले नाही. रथ ओढणारे सर्व सेवक तोंडाला...
शासकीय रुग्णालयात पीएम केअर्स फंडातून भारतीय बनावटीची ५० हजार वेंटिलेटर्स दिली जाणार
नवी दिल्ली : देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या शासकीय कोव्हीड रुग्णालयांमध्ये वेंटिलेटर्स लावण्यासाठी २ हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. पीएम केअर्स फंडातून ही मदत देण्यात आली असून...
सौदी अरेबियाच्या विनंतीवरुन यंदाची हज यात्रा रद्द
नवी दिल्ली : कोरोना संकटामुळं यंदा देशातून कोणालाही हज यात्रेसाठी न पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सौदी अरेबियाच्या हज खात्याच्या मंत्र्यांनी भारतातून हज साठी यात्रेकरूंना पाठवू नका असा...
पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यावर भारत आणि चीनमध्ये सहमती
नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून आपापलं सैन्य मागे घेण्यावर चीन आणि भारत यांच्यात सहमती झाली आहे. मोल्डो इथं काल दोन्ही देशांमधे झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या बैठकीत हा...
पतंजलीच्या कोविड १९ वरील औषधाच्या जाहिरातवर आयुष मंत्रालयाचे निर्बंध
नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वार (उत्तराखंड) यांनी कोविड -19 च्या उपचारासाठी विकसित केलेल्या आयुर्वेदिक औषधांच्या दाव्याविषयी माध्यमांमध्ये अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची आयुष मंत्रालयाने दखल घेतली आहे. या...
एका दिवसात १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचं बाजारमूल्य गाठणारी रिलायन्स भारतीय पहिली कंपनी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका दिवसात १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचं बाजारमूल्य गाठणारी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही जगातली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य आज दिवसभरात २८ हजार २४९...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय उद्या कळवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन मुळे पुढे ढकललेल्या आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आपला निर्णय, उद्या सर्वोच्च न्यायालयाला कळवणार आहे.
काही पालकांनी मंडळाकडे,...
पुरी इथल्या भगवान जगन्नाथ रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी.
नवी दिल्ली : ओदिशातल्या पुरी इथल्या भगवान जगन्नाथ मंदीराच्या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली . सरन्यायाधीश न्यायमुर्ती एस.ए.बोबडे आणि न्यायामुर्ती दिनेश महेश्वरी आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या...











