नवी दिल्ली : देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या शासकीय कोव्हीड रुग्णालयांमध्ये वेंटिलेटर्स लावण्यासाठी २ हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. पीएम केअर्स फंडातून ही मदत देण्यात आली असून यातून ५० हजार वेंटिलेटर्स लावली जाणार आहेत.

ही सर्व वेंटिलेटर्स भारतीय बनावटीची आहेत. याशिवाय एक हजार कोटी रुपये स्थलांतरित मजुरांसाठी देण्यात आले आहेत. यापैकी यापैकी सर्वाधिक म्हणजे १८१ कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले आहेत.