नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाने आज घेतलेल्या निर्णयांमुळे कष्टाळू शेतकऱ्यांना शेती आधारित उद्योगांकरता मदतीचा हात मिळेल, अशी प्रतिक्रीया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
शिशु कर्जांवरच्या व्याजात सवलतीचा फायदा सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना होईल असं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांचंही त्यांनी स्वागत केलं आहे.