देशवासियांचं जीवन सुखकर बनवण्यासाठी केंद्र सरकार झटत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशवासियांचं जीवन सुखकर बनवण्यासाठी आपलं सरकार झटत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं ते संवाद साधत होते....

भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल – केंद्रीय अर्थ राज्य...

पुणे : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'विकसित भारत संकल्प यात्रा' भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री...

महिला क्रिकेटमधे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडीयमवर झालेल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात भारताने उभारलेल्या ४२८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ...

इंडिया आघाडीकडे विकासाचं कोणतंही धोरण नसल्यानं त्यांच्यात विसंवाद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : इंडिया आघाडीकडे विकासाचं कोणतंही धोरण नसल्यानं त्यांच्यात विसंवाद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. देशाची सूत्र प्रधानमंत्री...

शिवसेना आमदार अपात्रेच्या सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदार अपात्रेच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. न्यायालयानं या प्रकरणी ३१ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र या...

राज्यातील स्टार्टअप्सना आवश्यक सर्व सहकार्य करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : राज्यातील स्टार्टअपला आवश्यक असलेले सर्व सहकार्य राज्य शासनाकडून केले जाईल. आपल्या राज्याला स्टार्टअपमध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिताबर्डी ते खापरी मेट्रो प्रवास

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी असा मेट्रो प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. मेट्रोचे...

नागरिकांनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : सर्वसामान्य जनतेला केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ व माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी यात्रेत सहभागी होऊन लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन...

‘परीक्षा पे चर्चा’चा उद्देश परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं आणि परिक्षार्थींनी हसतखेळत ध्येयप्राप्ती करणं हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी...

‘आयएनएस तरमुगली’ युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलद गतीनं हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ‘आयएनएस तरमुगली’ या युद्धनौकेचा काल विशाखा पट्टणम इथल्या नौदलाच्या तळावर आयोजित समारंभात भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. २००६ मध्ये...