पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्यावतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ल्यूमॅक्स ऑटो टेकनॉलॉजिस लि. चे वरिष्ठ  उपाध्यक्ष राजेश डुब्बेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीतासह अन्य देशभक्तीपर गीतेही सादर करण्यात आली. यावेळी बोलताना डुब्बेवार म्हणाले की, युवापिढीच्या हातातच देशाचे भवितव्य असल्यामुळे विद्यार्थ्यानी आपल्या सुरक्षित भविष्यासाठी विद्यार्थीदशेत असतानाच अभ्यासासोबतच आदर्श जीवनमूल्यांचाही अंगीकार करावा. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांच्यासह संस्थेचे सर्व अध्यापक वर्ग, अन्य कर्मचारी  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) येथे ध्वजारोहण करताना ल्यूमॅक्स ऑटो टेकनॉलॉजिस लि. चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश डुब्बेवार, यावेळी त्यांच्यासमवेत संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस उपस्थित  होते.