नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय बाजारात पेट्रोलच्या किमती पाच महिन्यातल्या निचांकी पातळीवर आल्याआहे तर डिझेल गेल्या ७ महिन्यातल्या सर्वात स्वस्त दरात मिळते आहे. मुंबईत आज पेट्रोलसुमारे ७७ रुपये ६४ पैसे दराने मिळत होते तर डिझेलची किंमत प्रति लिटर सुमारे ६८रुपये होती.

गेल्या महिनाभरात पेट्रोल ४ रुपयांनी तर डिझेल साडे चार रुपयांनीस्वस्त झाले आहे. गेल्या महिना भरात इंधनाच्या किंमतीत सातत्याने घट होताना दिसतेआहे. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इंधनाच्या मागणीत घट झाली आहे. तेलउत्पादक देशांकडून पुरवठा मात्र कायम राहिल्याने इंधनाच्या किंमतीत घट होते आहे.