नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या शिवभोजन थाळीला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर भाजपानं महाराष्ट्रात आजपासून दिनदयाळ थाळीची सुरुवात केली आहे. जनसंघाचे नेते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम सुरु करण्यात आला असून ही थाळी ३० रुपयात मिळणार आहे.






