नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटींचा निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. गाव ते तालुका आणि गाव ते जिल्हा या साधारण ६० किलोमीटरच्या परिघात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ९० टक्के आहे. या परिघात लालपरी अर्थात साधी परिवर्तन बसगाड्या चालवण्यात येतात.

एसटी सेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी दोन हजार साध्या परिवर्तन बस गाड्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी ६०० कोटींच्या निधीची तरतूद करावी, असा प्रस्ताव एसटी महामंडळानं सरकारला सादर केल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.