या विकासामुळे भारत अमली पदार्थ विरोधी विज्ञानात आत्मनिर्भर होईल: अनुराग सिंग ठाकूर

नवी दिल्‍ली : राष्ट्रीय अमली पदार्थ चाचणी प्रयोगशाळेने (NDTL) वैशिष्ट्यपूर्ण यशस्वी कामगिरी करत सहा नवीन आणि स्वदेशी बनावटीची दुर्मिळ संदर्भ सामग्री (रेफरन्स मटेरियल RMs) विकसित केले, जे जगभरातील सर्व जागतिक अमली पदार्थ विरोधी संस्थेच्या (WADA-World Anti Doping Agency)-मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये अमली पदार्थ विरोधी विश्लेषणासाठी आवश्यक असे विशुद्ध रसायन आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER)-गुवाहाटी आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परीषद (CSIR)-इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन (IIIM), जम्मू यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अंमली पदार्थ चाचणी प्रयोगशाळेने (NDTL) सहा प्रकारची संशोधित सामग्री एका वर्षापेक्षा कमी कालावधीत विकसित केली आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, श्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते, एनडीटीएलच्या नियामक मंडळाच्या 15 व्या बैठकीदरम्यान, क्रीडा सचिव श्रीमती सुजाता चतुर्वेदी  आणि क्रीडा मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचे उदघाटन करण्यात आले. या आरएमच्या निर्मितीमुळे एनडीटीएलने (NDTL) स्वतःला जगातील अशा काही प्रयोगशाळांपैकी एक म्हणून ओळख मिळवून दिली आहे; ज्यांनी अशी आरएम्स (RM) विकसित केली आहेत.या कामगिरीबद्दल बोलताना श्री.  ठाकूर म्हणाले, “हे संदर्भ साहित्य तयार करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या तीन संस्थांच्या शास्त्रज्ञांचे मी अभिनंदन करतो. या वैज्ञानिक विकासासह, भारताने खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे, जे डोपिंग विरोधी विज्ञानाच्या क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. लवकरच, आम्ही ही आरएम्स इतर देशांनाही निर्यात करणार आहोत.”

या संदर्भ सामग्रीचे संशोधन गेल्या वर्षी सुरू झाले, त्यासाठी एनडीटीएलने 2 -3 वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने, प्रतिबंधित पदार्थांच्या अशा 20 संदर्भ सामग्रीचे स्वदेशी संश्लेषण आणि विकास करण्यासाठी दोन्ही राष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला. एनडीटीएल आणि निपेर-जी (NIPER-G) आणि सीएस आयआर-आयआयआयएम जम्मू (CSIR-IIIM -Jammu), यांच्यातील हे संशोधन आणि विकास  उपक्रम भारत सरकारचे सक्रिय समर्थन आणि दिलेल्या निधीतून हाती घेण्यात आले आहेत.

प्रकाशित केलेल्या सहा संदर्भ साहित्यांपैकी, प्रत्येकी तीन निपेर-गुवाहाटी (NIPER-Guwahati) आणि सीएस आयआर-आयआयआयएम जम्मू (CSIR-IIIM-Jammu), यांच्या सहकार्याने संश्लेषित करण्यात आले.  गेल्या वर्षी देखील म्हणजे, 2021मध्ये एनडीटीएल आणि निपेर-जी (NIPER-G) आणि सीएस आयआर-आयआयआयएम जम्मू (CSIR-IIIM-Jammu), NIPER-Guwahati च्या शास्त्रज्ञांनी दोन स्वदेशी विकसित दुर्मिळ संदर्भ सामग्रीचे संश्लेषण करण्यात यश मिळवले जी प्रकाशित केली गेली आणि सहकारी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांसह (WADA)-सामायिक केली.

क्रीडा मंत्रालयाच्या प्रोत्साहन आणि अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने या संदर्भ सामग्रीच्या प्रकाशनामुळे सुधारित पद्धतीने एखाद्याने अंमली पदार्थांचे सेवन केल्याची पुष्टी करता येईल आणि देशातील खेळांमध्ये न्याय्य पध्दती आणण्याचे  एकमेव उद्दिष्ट साध्य करता येईल.