नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूविरुद्ध जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याचं आवाहन जागतिक बँकेनं केलं आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांना तातडीनं मदत करणं शक्य व्हावं, यादृष्टीनं आर्थिक आणि तांत्रिक संसधनाचा आपण आढावा घेत असल्याचं बँकेंन आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

यावर आंतरराष्ट्रीय प्रतिसाद वाढवण्याच्या दृष्टीनं जागतिक भागिदारांशी आपण समन्वय साधत असून, या समस्येच्या आर्थिक आणि सामाजिक परिणामावर आपलं बारकाईनं लक्ष आहे, असंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे.