मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा. हा आराखडा तयार करताना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे प्राधान्य निश्चित करावं, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. उद्घव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामविकास विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

बचतगटांना ई वाणिज्य मंचावर आणण्याचा प्रयत्न करावा. तालुकास्तरावरील सक्षम बचतगटांना शिवभोजन योजना राबविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावं,  अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मागास आणि आदिवासी ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या विशेष सहाय्यात वाढ केली जावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.