नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या काल नवी दिल्ली इथं फिक्कीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.सार्वजनिक संपत्तीचा वापर जबाबदारीनं करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे.

अर्थसंकल्पातल्या प्रस्तावित खर्चाचं उद्दिष्ट संपत्ती निर्माण करणं हेच आहे, असं त्या म्हणाल्या. निर्गुंतवणूकीतून मिळणा-या पैशाचा वापर पायाभूत सुविधांच्या विकासाकरता केला जाईल, त्यातून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असं सीतारामन यांनी सांगितलं.