नवी दिल्ली : युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे स्पोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडियाच्या वतीने नॅशनल टॅलेंट सर्च पोर्टल अर्थात राष्ट्रीय उत्कृष्ट क्रीडापटू शोध पोर्टल 28 ऑगस्ट 2017 रोजी सुरू करण्यात आले. देशभरातील विविध क्षेत्रातील विविध क्रीडा विषयक क्रीडापटूंना त्यांच्या संभाव्य क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी यासाठी या पोर्टलवर क्रीडापटू ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.
आतापर्यंत 4 लाख 62 हजार 83 क्रीडापटूंनी एनटीएसपीवर नाव नोंदवले असून 41 प्रशिक्षणार्थींची निवड झालेली आहे. हे पोर्टल 24X7 सुरू असून पात्र अर्जांचा विचार करण्यासाठी एसएआय प्रशिक्षण केंद्र लक्ष घालत आहे. आतापर्यंत 17 हजार 884 क्रीडापटूंनी नांव नोंदवले असून 1 हजार 29 अर्ज मिळाले आहेत. 667 पात्र क्रीडापटूंना एसएआयकडे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे.