नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनआयए, अर्थात केंद्रीय तपास संस्थेनं मुंबईत दाऊदशी संबंधित २० ठिकाणी छापे मारले. मुंबईतल्या नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात हे छापे टाकले आहेत. या २० संबंधितांमध्ये शार्प शूटर, तस्करांचा समावेश आहे, याशिवाय अनेक ऑपरेटर्सवरही छापे टाकले आहेत. भारतातल्या अनेक देशविरोधी कारवायांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याची माहिती यापूर्वी मिळाली होती, त्यावरुनच ही कारवाई केल्याचं एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.