नवी दिल्ली : कोरोनामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनचा, साखरेच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. जानेवारी ते जून या कालावधीत राज्यातून केवळ ३६ लाख टन साखरेची निर्यात झाली. या कालावधीसाठी ६० लाख टन निर्यातीच उद्दिष्ट होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही माहिती दिली.
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून यंदा जून अखेरपर्यंत राज्यातल्या १४४ साखर कारखान्यांनी ५७० लाख टन उसाचं गाळप करून ६३ लाख टन साखर उत्पादित केली आहे. मात्र गेल्या वर्षी जून पर्यंतच्या सहा महिन्यात साखरेचं उत्पादन १०७ लाख टन होतं, अशी माहितीही त्यांनी दिली.