नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखमधील सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या अनुषंगानं दोन्ही देशांदरम्यान काल विभागीय कमांडर पातळीवर बैठक पार पडली. भारतीय हद्दीतील दौलत बेग गोल्डी इथं ही बैठक झाली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासंदर्भात उभय देशांदरम्यान सुरू असलेल्या चर्चेची ही पाचवी फेरी होती. कालच्या बैठकीत मेजर जनरल बापट यांनी भारतीय शिष्टमंडळाचं प्रतिनिधीत्व केलं. दरम्यान लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल सुरक्षा दलांना सीमेवरील कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दुसरीकडे हवाई दलाचे उप्रमुख एअर मार्शल हरजीतसिंग अरोरा यांनी दौलत बेग ओल्डीला भेट देऊन पूर्व लडाखमधील हवाई दलाच्या सज्जतेचा आढावा घेतला.