मुंबई (वृत्तसंस्था): राज्यात काल ६ हजार ९७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत १५ लाख ३१ हजार २७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
काल ४ हजार ९०९ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ९२ हजार ६९३ झाली आहे.
सध्या १ लाख १६ हजार ५४३ रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९० पूर्णांक ४६ शतांश टक्के झाले आहे.
काल १२० कोरोनाग्रस्तांचा मृत्यु झाला असून राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ४४ हजार २४८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होत, असल्याने अनेक कोविड उपचार केंद्रे बंद केली जात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात काल ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ७५ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल नवीन ९ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात काल २७ तर आतापर्यंत ६ हजार १७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल नवीन २२ रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णसंख्या वाढून ६ हजार ६५६ झाली आहे. जिल्ह्यातली मृतांची संख्या २६८ झाली आहे. सध्या २१० रुग्ण उपचार घेत आहेत.
वाशिम जिल्ह्यात काल २८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार २०६ रुग्ण बरे झाले आहेत. काल ८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ७२६ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४३ रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या ३७६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
गडचिरोली जिल्हयात काल १०४ रुग्णांनी कोरोना वर मात केली जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार २०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत काल ९४ रुग्णांना या आजाराची लागण झाली त्यामुळे रुग्णांचा आकडा ६ हजार ११० झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात या आजारामुळे ६० रुग्ण दगावले आहेत सध्या ८४८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
सातारा जिल्ह्यात काल ५४६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत ४२ हजार ६८० रुग्णांना सुट्टी दिली आहे. काल ३४८ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४६ हजार ९३२ झाली आहे. आतापर्यंत १ हजार ५६८ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. सध्या २ हजार ६८४ रुग्ण उपचाराधीन आहेत.
जालना जिल्ह्यात काल १२७ तर आतापर्यंत १० हजार ११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल २४ रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या वाढून १० हजार ९२९ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे सध्या ४८२ रुग्ण उपचार घेत आहेत.