नवी दिल्ली : 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला उद्देशून भाषण करणार आहेत.

या भाषणाचे थेट प्रसारण आकाशवाणीच्या तसेच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून संध्याकाळी 7.00 वाजता केले जाईल. सुरुवातीला हिंदी आणि नंतर इंग्रजीतून भाषण प्रसारीत होईल.  त्यापाठोपाठ दूरदर्शनवर प्रादेशिक भाषांमधील भाषण प्रसारीत केले जाईल. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवर या भाषणाचा प्रादेशिक अनुवाद संध्याकाळी 8.00 वाजता सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रसारीत केला जाईल.