मुंबई :  कुलाबा-वांद्रे-एसईपीझेड कॅारिडोरमधील मेट्रो -3 मधील मेट्रो गाडीचे (रोलिंग स्टॉक मॉडेल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी अनावरण झाले.

मेट्रो तीनवरील या मार्गिकेला अॅक्वा लाईन असे नाव देण्यात आले आहे. यावेळी एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, तसेच प्रकल्प संचालक सुबोधकुमार गुप्ता, संचालक (प्रणाली) अजय कुमार भट्ट आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एमएमआरसीएसने अँलस्ट्रॅाम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेडला मेट्रोगाडी व तिच्या डब्यांच्या रचना व निर्मितीचे काम दिले आहे. यावेळी श्रीमती भिडे म्हणाल्या,“ऑलस्टॉम ट्रान्सपोर्ट इंडियाच्या श्री सिटी फॅक्टरीत यावर्षी नोव्हेंबरमध्ये गाड्यांचे उत्पादन सुरू होईल आणि एका वर्षाच्या आत पहिल्या ट्रेनचे आगमन अपेक्षित आहे.

यावेळी मुंबई-मेट्रो रेल कॉर्पोरेशन-एमएमआरसीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एकत्रित केलेला चार लाख रुपयांचा धनादेश व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला

या मेट्रोगाडीची काही वैशिष्ट्ये:

  • आर्द्रता नियंत्रित करणारे पूर्णपणे वातानुकूलित कोच प्रशिक्षक आत सुरक्षित आणि आरामदायक वातावरण.
  • माहिती, जाहिरात आणि करमणूक यासाठी एलसीडी स्क्रिन.
  • डिजिटल मार्ग, नकाशा सूचक.
  • सहज प्रवासी उतरण्यासाठी प्रवासी घोषणा प्रणाली.
  • उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी आधार, आरामदायी आसन व्यवस्था.
  • दिव्यांगासाठी चाकाच्या खुर्चीसह सामावून घेणारी विशेष आसन व्यवस्था.
  • स्वच्छ आणि सुलभ वायूवीजन व्यवस्था.
  • प्रत्येक डब्यात सीसीटीव्हीची देखरेख प्रणाली, आगीपासून बचावासाठी स्मोक डिटेक्टर आणि अग्निशामक यंत्र आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि नियंत्रण कक्षाशी संपर्काची व्यवस्था.