पुणे : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांकरिता 31 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी केले आहे. बालशक्ती पुरस्कारासाठी ज्या मुलांनी( वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण,कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्य पूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

बालकल्याण पुरस्कारामध्ये

1. वैयक्तिक पुरस्कार:- मुलांच्या विकास संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.

2.संस्था स्तरावर:- बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णतः शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी.बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. बाल शक्ती पुरस्कार 2019 व बाल कल्याण पुरस्कार 2019 करिता केंद्र शासनाने अर्ज मागवले आहेत.

अर्ज हे www.nca-wcd.nic in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. पुरस्कारांची माहिती वरील संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी कळविले आहे.